पाकिस्तानातील लाहोर ठरले जगातील सर्वात प्रदुषित शहर

लाहोर – जगभरातील सर्वात प्रदुषित शहर म्हणून पाकिस्तानातील लाहोरचे नाव पुढे आहे. आमेरिकेतील “एअर क्वालिटी इंडेक्‍स’ने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार लाहोर हे सर्वात प्रदुषित शहर ठरले आहे. या प्रदुषित हवेच्या निर्देशांकानुसार जगभरातील प्रदुषित शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये बुधवारी लाहोरचा प्रदुषण निर्देशांक 600 इतका नोंदवला गेला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा नंबर लागतो आहे.

या यादीमध्ये कराची पाचव्या क्रमांकावर आहे. गुलबर्गमध्ये 681, रायविंडमध्ये 626, अनारकली मार्केटमध्ये 541 आणि मॉडेल टाऊनमध्ये 532 पातळी नोंदवण्यात आली. दरम्यान, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात धुक्‍यामुळे अधिकाऱ्यांची चिंता वाढवली आहे.
या निर्देशांकानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक जर 50 च्या खाली असेल तर ती समाधानाची बाब समजली जाते. लाहोरच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देसांकाची सरासरी 301 आणि त्यापुढे नोंदवली गेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.