नवी दिल्ली – बुंदेसलीगा फुटबॉल स्पर्धा करोनाचा धोका कमी झाल्याने पुन्हा एकदा सुरू झाली असली तरीही ला लीगा व इपीएल या स्पर्धांवर अद्याप करोनाचे संकट कायम राहिले आहे.
इपीएलमधील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाल्यानंतर आता ही स्पर्धा होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच ला लीगा स्पर्धेवर देखील करोनाचे सावट निर्माण झाले आहे. स्पेन सरकारने या स्पर्धेला परवानगी दिली असली तरीही करोनाचा धोका कायम असल्याने स्पर्धा संकटात सापडली आहे.