पुणे – नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील पहिल्या पीएमडीटीए केपीआयटी लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात अर्जुन परदेशी याने तर, मुलींच्या गटात श्रेया पठारे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत मुलांच्या गटात बिगरमानांकित अर्जुन परदेशीने चौथ्या मानांकित समिहन देशमुखचा 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. तिसऱ्या मानांकित क्रिशांक जोशीने नमिश हूडचा टायब्रेकमध्ये 6-5 (4) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
मुलींच्या गटात श्रेया पठारे हिने दुसऱ्या मानांकित अस्मि टिळेकरचा 6-2 असा सहज पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित हृतिका कापलेने अनुष्का जोगळेकरचा 6-1 असा एकतर्फी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा संक्षिप्त निकाल – उपांत्यपूर्व फेरी – मुले – सनत कडले वि. वि. वेद मोघे 6-4. अर्जुन परदेशी वि. वि. समिहन देशमुख (4) 6-3. क्रिशांक जोशी (3) वि. वि. नमिश हूड 6-5 (4). आर्यन कीर्तने वि. वि. प्रज्ञेश शेळके 6-2. मुली – हृतिका कपले (1) वि. वि. अनुष्का जोगळेकर 6-1. ध्रुवा माने (3) वि. वि. सान्वी थंपी 6-2. सृष्टी सूर्यवंशी वि. वि. काव्या पांडे 6-4. श्रेया पठारे वि. वि. आस्मि टिळेकर (2) 6-2.