मुंबई – बॉलीवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्यांचा प्रभाव अद्याप प्रेक्षकांच्या मनावर आहे. त्यातही रोमँटिक चित्रपटांची संख्या मोठी आहे. “रहना है तेरे दिल मैं’ हा चित्रपट देखील उदाहरण म्हणून सांगता येईल. पण 20 वर्षपूर्वीच्या या चित्रपटाची कथा, गाणी, संवाद, कलाकार अन त्यांचा अभिनय सर्वांच्या आवडीचा भाग होता.
View this post on Instagram
दरम्यान, आता इतक्या वर्षानंतर हा चित्रपट आठवण्याचे कारण काय तर, गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटात सिक्वेल येणार अशी चर्चा रंगू लागली आहे. “रहना है तेरे दिल मैं’ या चित्रपटात अभिनेता आर. माधवन, सैफ अली खान आणि अभिनेत्री दिया मिर्झा मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचा सिक्वल ‘रहना है तेरे दिल मैं’चे निर्माते वासु भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी बनविण्याच्या तयारीत आहे.
View this post on Instagram
नव्या रंगरूपात आणि नव्या स्टारकास्टसह हा चित्रपटात बनवणार असून, यामध्ये अभिनेत्री क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यासाठी क्रितीचे नाव देखील फायनल करण्यात आले आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली. आता हे दोन हिरो कोण असतील, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे.
View this post on Instagram