मुंबई – अभिनेत्री क्रिती सॅननने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. नुकतेच तिने ‘आदिपुरुष’ या चित्रपटात ‘जानकी’च्या भूमिकेत दिसली होती. मात्र या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. मात्र आता क्रितीने अभिनयासह आता आणखी एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे.
क्रिती आता एक निर्माती म्हणून करिअरची सुरुवात करणार आहे. सोशल मीडियाद्वारे तिने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एक क्रितीने तिच्या प्रोडक्शन हाऊसचा टीझर शेअर केला आहे. ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ असे तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आहे. यानंतर तिचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. अनेक सेलिब्रिटींंनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
याबाबत क्रिती म्हणाली की, नवी सुरुवात करण्यासाठी खूप उत्साहित आहे. गियर बदलण्याची वेळ आली आहे. या इंडस्ट्रीत मी नऊ वर्षांपासून माझे स्वप्न जगत आहे. मला चित्रपट निर्मितीचा प्रत्येक पैलू आवडतो. आता काहीतरी वेगळे करण्याची वेळ आली आहे. माझ्या आणि तुमच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या आणखी कथा सांगण्याची वेळ आली आहे, आशा आहे की तुम्हाला ते खूप आवडेल.” ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ची सुरुवात करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचेही तिने सांगितले आहे.
दरम्यान, क्रितीच्या या घोषणे नंतर काही वेळातच सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होऊ लागला. हा स्क्रीनशॉट दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा आहे. व्हायरल फोटोत एका चाहतीने काही वर्षांपूर्वी सुशांतला प्रश्न विचारला आहे. “तू नेहमी ब्लू बटरफ्लाय च्या इमोजीची सतत वापर करताना दिसतो. यामगे काही खास कारण आहे का? असा प्रश्न विचारला आहे.
यावर सुशांत उत्तर देतो…, ‘हे एक प्रतीक आहे. सुरुवात, बिना अडचण चालत राहण्याचं, तुमच्या आणि माझ्या सर्वांच्याच आयुष्यातलं हे प्रतीक आहे.’ सुशांतने चाहतीला नक्की यामागचं कारण काय आहे ते कमेंटमध्ये समजावून सांगितलंय. क्रिती सेननने प्रोडक्शन हाऊसचं नाव जाहीर करतानाच नेटकऱ्यांनी ही कमेंट शोधून काढली आहे. आता ती व्हायरल केली जात आहे. मात्र, क्रिती आणि सुशांत यांच्यातला नेमका संबंध अद्याप स्पष्ट झालेला नाही.