मुंबई – बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा एकापाठोपाठ एक चित्रपटांची घोषणा करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने रोहित धवन दिग्दर्शित “शहजादा’या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हा पासूनच फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. “शहजादा’ चित्रपटात कार्तिक आर्यन सोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलु’ या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन असणार आहे.
दरम्यान, मोठ्या पडद्यावर या चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी क्रितीच्या या चित्रपटादरम्यान अभिनेता श्रेयस तळपदे याने केलेलं एक ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. सध्या सोशल मीडियावर श्रेयस तळपदे याच्या एका ट्विटचा स्क्रिनशॉट चांगलाच व्हायरल होतो आहे. त्यात अभिनेत्यानं म्हंटलं आहे की, “आताच ‘शहजादा’ चित्रपट पाहिला. कार्तिक आर्यन चांगलं काम केलं आहे. तर क्रिती सेनन ही देशाची पुढची मधुबाला आहे..’ असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Dear @kritisanon, I am so sorry a tweet was sent to you via a fake account under my name. Will take it up with @verified @TwitterSupport and block the imposter immediately.
That aside…sending you love and luck for Shehzada 😊
— Shreyas Talpade (@shreyastalpade1) February 21, 2023
त्याच हे ट्विट पाहून अभिनेत्री देखील भारावून गेली आणि श्रेयसच्या या ट्वीटवर क्रिती सेनन हिने देखील उत्तर दिल्याचं स्क्रिनशॉटमध्ये दिसते आहे. तिनं या ट्विटला उत्तर दिलं. ‘वॉव मधुबाला यांची जागा तर नाही घेऊ शकत. परंतु इतकी प्रेमळ प्रतिक्रिया पाहून भारावून गेले आहे. धन्यवाद.!’ असं तिने म्हंटलं आहे.
परंतु या मागचं सत्य काही वेगळं असून, हे ट्विट श्रेयस तळपदेच्या फेक ट्विटर आकाउंटवरून करण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. स्वत: श्रेयसने याविषयी माहिती दिली. त्यानं आपल्या ब्लू टिक असलेल्या वेरिफाईड आकाउंटवरून एक ट्विट केलं असून, त्यामध्ये श्रेयस म्हणतो की, “प्रिय क्रिती सेनन , माझ्या नावाच्या खोटं अकाऊंटवरून तुला मेसेज केला आहे. त्याबद्दल मी माफी मागतो.’ याबरोबरच अभिनेत्यानं ट्विटर वेरिफाईड आणि ट्विटर सपोर्टलाही टॅग केलं आहे. तसंच ते अकाऊंट ब्लॉक करण्याची मागणी केली आहे.