मुंबई – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री कृष्णा मुखर्जी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अशात अभिनेत्री तिच्या गर्ल गँगसोबत बॅचलोरेट ट्रिपचा आनंद घेत आहे. फुकेत, थायलंड येथील कृष्णाने तिच्या बॅचलोरेट पार्टीचे फोटो शेअर केले. ज्यात कृष्णा तिच्या मित्रांसोबत मजा करताना दिसली. पण नुकतेच शेअर केलेले कृष्णाचे हे फोटो सोशल मीडिया यूजर्सच्या पसंतीस उतरले नाहीत आणि तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, कृष्णा मुखर्जी फुकेतमध्ये मित्रांसोबत सुट्टी साजरी करत आहेत आणि सोशल मीडियावर कृष्णाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. अलीकडे, या फोटोमध्ये तिने तिच्या मानेखाली आणि हातावर ‘ब्राइड टू बी’ असे लिहिले आहे. हे लिहिलेले सोशल मीडिया युजर्सला आवडले नाही. सोशल मीडिया युजर्सने अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. लोक अभिनेत्रीसाठी वेगवेगळ्या कंमेंट्स करत आहेत.
फोटोमध्ये, कृष्णा मुखर्जी , शिरीन मिर्झा आणि तिच्या मित्रांसह क्लबमध्ये पार्टी करत आहेत. कृष्णा आणि तिचे सर्व फ़्रेंड्स काळ्या पोशाखात आहेत. यामध्ये कृष्णा डीप नेकच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच स्टायलिश दिसत होती, मात्र तिच्या गळ्यात आणि हातावर केशरी रंगाने वधू लिहिण्याच्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
एकीकडे अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडत आहेत, तर दुसरीकडे काही जण तिला शो ऑफ असल्याचे सांगून ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले, ‘तुउर्फीपेक्षा कमी नाही…’ तर एका युजरने लिहिले, ‘कहीं ये पागल ना जाये’ असं म्हणत टीका केली आहे.