आबुधाबी –मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज होत असलेला सामना कोलकाता संघासाठी महत्त्वाचा आहे. मुंबईने क्रमवारीत अग्रस्थान मिळवले आहे. मात्र, कोलकातासाठी ही लढत स्पर्धेत टीकून राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बनली आहे.
मुंबई आणि कोलकाता यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूनं लागला आहे. कोलकाताचा कर्णधार इयान मॉर्गन याने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली आहे.
#KKR have won the toss and they will bat first against #MI.#Dream11IPL pic.twitter.com/xQkOmxI6wS
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
स्पर्धेत, मुंबई इंडियन्सने सात सामन्यापैकी 5 सामन्यात विजय मिळविला आहे, तर दुसरीकडे कोलकाता संघास सात सामन्यापैकी 4 सामन्यात विजय तर 3 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.