कोल्हापूर – जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटव्ह आली आहे. शुक्रवारी रात्री त्यांना ताप आणि खोकला आला होता. यानंतर त्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती. मात्र ती निगेटिव्ह आली.
यानंतर आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ती पॉजिटीव्ह आली.
दरम्यानच्या काळात पाटील यांनी काल जलव्यवस्थापन समिती बैठकीस हजेरी लावली. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि अध्यक्ष कार्यालयाचे कर्मचारी यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. लॉकडाऊनमध्ये कोणीही पदाधिकारी जिल्हा परिषदेत येणार नाही अशी घोषणा अध्यक्ष पाटील यांनी केली होती.
मात्र ते दररोज न चुकता कार्यालयात येत होते. महत्वाचे म्हणजे त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.