कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत.
चार स्वयंचलित दरवाज्यांसह पायथा विद्युतगृहातून 7,112 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.