कोल्हापूर(प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या लढाईत अग्रेसर असणारे खासदार संभाजीराजे छत्रपती यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ अॅड. गुणवंत सदावर्ते यांच्या विरोधात कोल्हापूरकर नागरिक रस्त्यावर उतरले आहे.
विशेष म्हणजे कोल्हापुरातील राजे प्रेमी, विविध सामाजिक संघटन, विविध पक्ष आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी रस्त्यावर उतरून छत्रपतींची बदनामी करणाऱ्या गुणवंत सदावर्ते यांचा जाहीर निषेध केला आहे.
तसेच सदावर्ते यांच्या पोस्टरचा चपलांचा मार देत पोस्टर अक्षरशा फाडून टाकली आहे. कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करत सदावर्ते यांचा निषेध कोल्हापूर स्टाईलने त्यांना इशारा दिला आहे..