पुणे – कोरोनाची बाधा होणाऱ्यांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता हळूहळू वाढत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात 798 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 32 जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच समाधानाची बाब म्हणजे 805 रूग्ण हे कोरोनामुक्त होऊन रूग्णालयातून घरी गेले आहेत. पुणे शहरात एकूण 14 हजार 32 कोरोनाबाधित रूग्ण आहेत.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ही 1 लाख 52 हजार 200 पर्यंत गेली आहे. तर 1 लाख 34 हजार 405 रूग्ण हे उपचारानंतर बरे होऊन रूग्णालयातून घरी गेले आहेत.
एकूण 14 हजार 32 अॅक्टिव्ह रूग्णांपैकी 869 रूग्ण गंभीर असून त्यापैकी 496 रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
पुणे शहरातील कोरोनाचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत अशा सुचना वारंवार प्रशासनाकडून
करण्यात येत आहेत.