पुणे – विरोधी गटातील तरुणासमवेत फिरत असल्याच्या कारणातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केले. या घटनेत तरुणाने वार चुकवून जीव वाचवला. त्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग करताना रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली.
याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. मॉंटी ऊर्फ कुणाल मारुती कालेकर (22, रा. अप्पर इंदिरानगर) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयुर जगताप (22, रा.अप्पर इंदिरानगर) याने फिर्याद दिली आहे. शनिवारी रात्री जगताप हा त्याच्या घरी पायी जात होता. त्यावेळी आरोपीने त्याच्यावर वार केले.