नवी दिल्ली – लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आणि भारताचा स्टार खेळाडू केएल राहुल याला सोमवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मधील सामन्यात दुखापत झाली आहे. चेंडू अडवताना त्याच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे. तेवढ्यातच तो मैदानावर झोपला आणि नंतर मैदानाबाहेर गेला. पण नंतर फलंदाजीसाठी राहुलला मैदानात उतरवण्यात आले पण तरीही तो तंदुरुस्त दिसत नव्हता.
राहुलच्या दुखापतीबाबत साशंकता वाढत आहे. एलएसजीचा स्टँड-इन कर्णधार क्रुणाल पंड्याने सामन्यानंतर राहुलबद्दल अपडेट दिले आहे. त्याने सांगितले की ”राहुलची हिप फ्लेक्सर खेचली गेली आहे, ही खूप दुःखाची गोष्ट आहे. हे दुखणं किती वाईट आहे हे मला माहीत नाही, वैद्यकीय पथक त्याचे मूल्यांकन करेल.” राहुलने दुखापतीचे स्कॅनिंग केले असून त्याचे निकाल लवकरच समोर येतील, अशी माहिती मिळत आहे.
तर ‘WTC’च्या संघातुन राहुल होऊ शकतो बाहेर…
जून महिन्यामध्ये होणाऱ्या WTC चॅम्पियन चा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया असा रंगणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये के एल राहुलचा देखील समावेश आहे. जर तो वेळेत तंदुरुस्त झाला नाही तर लखनऊ आणि भारत दोघांनाही त्याच्या बदलीबद्दल विचार करावा लागणार आहे.
‘WTC’चॅम्पियनमध्ये या 3 पैकी एका खेळाडूला मिळू शकते स्थान…
सरफराज खान-
दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज सरफराज खानला संघात स्थान मिळू शकते. सरफराजने देशांतर्गत हंगामात दमदार कामगिरी केली आहे. मुंबईसाठी नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने तीन शतके झळकावली आहेत. दरम्यान, बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य सिरधरन शरथ यांनी यापूर्वीच सरफराज संघाच्या नजरेत असल्याचे सांगितले आहे.
इशान किशन –
मुंबई इंडियन्सचा फलंदाज इशान किशन राहुलसाठी दुसरा पर्याय असू शकतो. किशन एक चांगला हिटर आहे आणि तो निर्णायक ठरू शकतो कारण भारताला आधीच ऋषभ पंतची उणीव आहे. शिवाय, किशन विकेटकीपिंगही करतो. त्यामुळे केएस भरतनंतर संघात विकेटकिपरचा एक पर्याय त्याच्या रूपाने वाढू शकतो.
संजू सॅमसन –
संजू सॅमसन हा एक असा खेळाडू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत असूनही भारतीय संघात नियमितपणे खेळताना दिसत नाही. तो एक अतिशय कुशल यष्टिरक्षक देखील आहे. संजू सॅमसन एक उत्तम विकेटकिपर आहे. त्यामुळे केएल राहुलच्या जागी विकेटकिपर फलंदाज म्हणून संजू सॅमसन एक उत्तम पर्याय ठरू शकतो.