Lok Sabha Election 2024 Congress fourth list announced – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने शनिवारी चौथी यादी जाहीर केली. काँग्रेसने 46 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील 4 जगांचा समावेश करण्यात आला आहे.
नागपूर येथून विकास ठाकरे , रामटेकमध्ये रश्मी शामकुमार बर्वे, गडचिरोली चिमूर येथून डाॅ. नामदेव दसाराम किरसान, भंडारा गोंदिया येथून डाॅ. प्रशांत यादवराव पडोळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तसेच दिग्विजय सिंह यांना मध्य प्रदेशातील राजगडमधून तिकीट देण्यात आले आहे. अजय राय यांना वाराणसीतून पीएम मोदींविरोधात उभे केले आहे.
अमेठी आणि रायबरेलीमध्ये अजूनही उमेदवार उभे करण्याची प्रतीक्षा आहे. चौथ्या यादीतही या दोन विशेष जागांसाठी उमेदवार जाहीर झालेले नाहीत. काँग्रेसने 46 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात 9 उमेदवार उत्तर प्रदेश, 2 उत्तराखंड आणि 12 उमेदवार मध्य प्रदेशातून उभे करण्यात आले आहेत.