सुपरस्टार आणि किंग खान अर्थात शाहरुख खानला पुन्हा एकदा मोठया पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. शाहरुख लवकरच “पठाण’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाशी संबंधीत अनेक अपडेट येत असतात.
या चित्रपटासाठी शाहरुखने निर्मात्यांकडून मोठी रक्कम वसूल केली असल्याचे समजते. या चित्रपटासाठी शाहरुखने तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती आहे. तो इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. यासह शाहरुखने मानधनाबाबत अक्षय कुमार, सलमान खान आणि अन्य कलाकारांना मागे टाकले आहे.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमित कमी 100 कोटींची कमाई केली तरी शाहरुखला यातील सुमारे 45 कोटी रुपये मिळणार आहे. “पठाण’मध्ये शाहरुखसह जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सकडून करण्यात येणार आहे. यातील शाहरुखच्या लुकबाबत खूपच चर्चा आहे.
यात सलमान खानदेखील विशेष भूमिका साकारत आहे. या चित्रपटात चाहत्यांना हॉलीवूड स्तरावरील ऍक्शन सिन पाहावयास मिळणार आहे. दरम्यान, शाहरुखने दुबईत “पठाण’चे शूटिंग केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या तो एका कारवर उभा असलेला दिसत आहे.