Mohan Yadav : अनेक चर्चांनंतर मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्रीपदाची माळ डॉ. मोहन यादव (MP CM Mohan Yadav) यांच्या गळ्यात पडली आहे. त्यानंतर नुकतंच डॉ. मोहन यादव यांनी उज्जैनमधील महाकालचे ( Baba Mahakal ) दर्शन घेतले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री यादव यांनी अनेक वर्षांपासून चालत आलेल्या एका अंधश्रद्धेला आणि दंतकथेचा छेद दिला असल्याचं दिसून आलं.
मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये वर्षानुवर्षे एक दंतकथा होती की, येथे रात्री कोणीही राजा मुक्काम करु शकत नाही. या कारणास्तव कोणताही नेता येथे रात्री थांबला नाही. या दंतकथेवर बोलताना मुख्यमंत्री यादव म्हणाले, “मी भगवान महाकालचा पुत्र आहे. आम्ही बाबा महाकालची लेकरे आहोत. बाबा महाकाल हा संपूर्ण विश्वाचा राजा आहे.
#WATCH | Ujjain: Madhya Pradesh CM Mohan Yadav says, “…Baba Mahakal blesses everyone…Fortunate that I live here…” pic.twitter.com/IuZqPeDe2k
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 17, 2023
त्यामुळे मी येथे राहू शकतो. सिंधिया महाराज यांना आपल्या राजकीय धोरणाचा भाग म्हणून आपली राजधानी उज्जैन येथून ग्वाल्हेरला हलवावी लागली हाेती. रात्रीच्या अंधारात उज्जैनवर कोणताही हल्ला होऊ नये, यासाठी या दंतकथेची (समज) निर्मिती झाली, असे स्पष्ट करत राजा महाकाल हा संपूर्ण विश्वाचा राजा आहे.’ असं ते म्हणाले.
महाकालच इथला राजा…
या दंतकथा आणि आख्यायिकांचं कारण असं सांगण्यात येतं, की उज्जैन शहरात केवळ एकच राजा राहू शकतो, आणि तो राजा म्हणजे महाकाल! ( Baba Mahakal )राजा भोज याच्या काळापासूनच ही प्रथा पाळण्यात येते असं मानलं जातं. कुणीही राजा, मंत्री अथवा लोकप्रतिनीनिधी उज्जैनमध्ये राहत नाही. कारण उज्जैनचा राजा आजही महाकालच असल्याचं मानलं जातं.
त्यामुळे त्याला झुगारून जो कुणी उज्जैनमध्ये वास्तव्य करेल, त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल. या शिक्षेच्या रूपात त्याची सत्ता जाईल असं मानलं जातं. योगायोगाने किंवा नियतीच्या खेळामुळे याआधी घडलेल्या काही घटना पाहता, यावर अनेकांचा विश्वास सुद्धा आहे.