कैरो – युरकोपात जाणाऱ्या शरणार्थ्यांची बटबुडून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान ६० जणांना जलसमाधी मिळाली आहे. लीबियाच्या किनारपट्टीजवळ ही दुर्घटना घडल्याचे संयुक्त राष्ट्राच्या स्थलांतरितांच्या एजन्सीने म्हटले आहे. भूमध्य समुद्रामध्ये अशाप्रकारची ही सर्वात अलिकडची दुर्घटना आहे.
युरोपातील सुखनैव जीवनासाठी उत्तर आफ्रिकेतील देशांमधील स्थलांतरितांकडून लीबियात जाण्यासाठी या धोकादायक सागरी मार्गाने प्रवासाचा मार्ग स्वीकारला जातो. यापूर्वी अशा प्रकारे बोट बुडाल्यामुळे आतापर्यंत हजारो जणांना प्राण गमवावे लागले आहेत. / वर्षात आतापर्यंत २,५०० जणांना या सागरी प्रवासात प्राण गमवावे लागले आहेत.
दुर्घटनाग्रस्त झालेल्या बोटीमध्ये ८६ स्थलांतरीत होते, असे संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत संघटनेने म्हटले आहे. लीबियाच्या पष्चिमेकडील किनार्याजवळील झुवारा या बेटाजवळ सासाट्याच्या वाऱ्यामुळे ही बोट बुडाली. यामुळे बोटीतील ६१ जण समुद्रामध्ये बुडाले, असे या दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीने सांगितले.