मुंबई – राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या ऑफिसला फोन करून रूपाली चाकणकर यांना पुढील 24 तासांत जीवे मारू, असा अज्ञाताने इशारा दिलाय. धमकीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. मागील काही दिवसांत तिसऱ्यांदा धमकीचा फोन आला आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना अज्ञाताकडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात धमकीचा फोन आल्याची माहिती देण्यात आली. याआधीही रुपाली चाकणकर यांना धमकीचे फोन आलेले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आघाडीचे नाव म्हणून चाकणकर यांच्याकडे पाहिले जाते. रस्त्यावरची आंदोलने, विषयांची मुद्देसूद मांडणी, विरोधकांना निरूत्तर करण्याची शैली यामुळे ते प्रकाशझोतात असतात.