काठमांडू – नेपाळमधील बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष अखेर सापडले आहे. मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-2 येथे दुर्घटनाग्रस्त विमान नेपाळ लष्कराला बेपत्ता विमान शोधण्यात यश आले आहे. या अपघातातील 21 जणांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये 4 भारतीयांचा समावेश आहे. नेपाळ एअरलाईन्सकडून मृत प्रवाशांची नावे जाहीर केली आहेत.
रविवारी चार भारतीयांसह 22 जणांसह विमान बेपत्ता झाले होते. नेपाळमधील मुस्तांग भागात हा विमान अपघात झाला. लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल नारायण सिलवाल यांनी विमानावर क्रमांक स्पष्टपणे दिसत असलेल्या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषाच्या फोटोसह ट्विट केले आहेत. नेपाळ सैन्याच्या शोध आणि बचाव दलाने विमान अपघात स्थळाचा प्रत्यक्ष शोध घेतला आहे.
बेपत्ता विमानाचा युद्धपातळीवर शोध होता. मात्र, काल बर्फवृष्टीमुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. खराब हवामानात नेपाळच्या सेनेचं एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचा अंदाज असलेल्या भागात पोहोचले. बर्फवृष्टी थांबल्यानंतर आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. पायलटच्या फोनंच शेवटचं लोकेशन ट्रॅक करत विमान शोधण्यात यश आले आहे.
या विमानात चार भारतीय नागरिकांसह एकूण 22 जण होते. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने माहिती दिली की, उड्डाणानंतर 15 मिनिटांनी विमानाचा कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला. यानंतर विमान बेपत्ता झाले. त्यानंतर संपर्क तुटलेल्या भागात मोठा स्फोटासारखा आवाज झाला. नेपाळमध्ये पोखरा ते जोमसोम या ठिकाणी जात असलेल्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले.