मुंबई – अभिनेत्री कियारा अडवाणीने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतेच तिचा ‘सत्यप्रेम की कथा’ रिलीज झाला. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता कियाराने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटासाठी तिने ऑडिशन दिली होती. मात्र तिला भूमिका मिळाली नसल्याचे तिने सांगितले आहे.
‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातील कियाराच्या भूमिकेसाठी कियाराला नकार मिळाल्याचे तिने सांगितले. करिनाच्या कोणत्याही चित्रपटासाठी तु ऑडिशन दिले आहे का?, असा प्रश्न कियाराला विचारण्यात आला होता. यावर कियारा म्हणाली की, “हो, मी ‘लाल सिंग चड्ढा’ साठी ऑडिशन देखील दिले होते. त्यावेळी मला माहिती नव्हते की ते ऑडिशन लाल सिंग चड्ढा साठी आहे. पण मला ते ऑडिशन पुन्हा बघायचे नाही कारण ते भयानक आहे. ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.” कियाराला तिची ऑडिशन आवडली नसल्याचे तिने सांगितले.
आमिर खानचा ‘लाल सिंह चढ्ढा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. रिपोर्ट्नुसार, 180 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने 130 कोटींची कमाई केली होती. बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपटाच्या कमाईवर वाईट परिणाम झाला. दरम्यान, कियारा अडवाणी सध्या तिच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटानंतर कियारा ‘वॉर 2’, ‘गेम चेंजर’ आणि ‘अदल बादल’मध्ये दिसणार आहे.