मुंबई – दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आणि जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. खुशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. नुकतेच खुशीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे आणि चाहते तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत आहे.
खुशी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये, तिने ब्लॅक कट ड्रेस घातलेला दिसत आहे, ज्यामध्ये त्रिकोणी झिग झॅग कट देखील आहेत.
या ड्रेसमध्ये खुशीची स्टाइल खूपच हॉट दिसत आहे आणि केवळ चाहतेच नाही तर स्टार्सही कमेंट करून तिच्या किलर स्टाइलचे कौतुक करत आहेत. खुशी कपूरचे हे मनमोहक फोटोशूट काही वेळातच व्हायरल झाले आहे.
खुशी कपूर तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. खुशी झोया अख्तरच्या आगामी ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.