नवीदिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७२ व्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. ठीक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्म दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बॉलिवूडमधून देखील अनेकांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटके स्टाईलने शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे. “तुमचे व्हिजन तुमचा आपलेपणा, तुमची काम करण्याची कॅपॅसिटी अशा काही गोष्टी मला प्रेरणा देतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही निरोगी आणि आनंदी रहा” अशा आशयाचे ट्विट अभिनेता अक्षय कुमारने केले आहे. अक्षय प्रमाणे इंडस्ट्रीतील अनेकांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
Your vision, your warmth, and your capacity to work…just some of the many things that I find deeply inspiring. Happy Birthday @narendramodi ji. Wish you health, happiness and a glorious year ahead. 🙏🏻 pic.twitter.com/0Ic7JmoZ3K
— Akshay Kumar (@akshaykumar) September 17, 2022
अभिनेता अनुपम खैर यांनी देखील एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी! आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ! प्रभु आपको लम्बी और स्वस्थ आयु प्रदान करें! आप अपनी शपथ की ज़िम्मेदारी को बखूबी निभाने का प्रयत्न कर रहें है!सालों तक करते रहेंगे! आपके नेतृत्व के लिए धन्यवाद! Happy Birthday Prime Minister #Modiji!🙏 pic.twitter.com/xoFmYSbDSH
— Anupam Kher (@AnupamPKher) September 17, 2022