नवी दिल्ली – खेलो इंडिया युथ गेम्सची चौथी आवृत्ती 30 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशात आयोजित केली जाणार आहे. भोपाळला सर्वाधिक नऊ खेळांचे यजमानपद मिळाले आहे. यामध्ये देशातील सहा हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. मध्य प्रदेशातील आठ शहरांव्यतिरिक्त दिल्लीतही ही स्पर्धा नियोजित आहे. भोपाळमधील तात्या टोपे नगर स्टेडियमवर 30 जानेवारी रोजी उद्घाटन सोहळा तर, 11 फेब्रुवारीला भोपाळमध्येच समारोप सोहळा रंगणार आहे.
“लाईन आणि लेंथवर काम कर आणि…”, मोहम्मद शमीचा उमरान मलिकला मोलाचा सल्ला
मध्य प्रदेशातील भोपाळ, बालाघाट, ग्वाल्हेर, इंदूर, जबलपूर, महेश्वर, मंडला आणि उज्जैन येथे खेळांचे आयोजन केले जाणार आहे. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये एकूण 29 विविध खेळांमध्ये खेळाडू सहभागी होणार आहेत. यापैकी स्पोर्टस ट्रॅक-सायकलिंग दिल्लीत आयोजित करण्यात येणार आहे. दिल्ली व्यतिरिक्त, महेश्वर आणि बालाघाट ही दोनच ठिकाणे आहेत जिथे प्रत्येकी एका खेळाचे आयोजन करण्यात येईल.
“कसं जिंकायचं ते भारताकडून शिका”, रमीझ राजांकडून टीम इंडियाचे कौतुक तर पाकिस्तानला घरचा आहेर
स्टार स्पोर्टवर प्रक्षेपण
खेलो इंडिया युथ गेम्समध्ये समाविष्ट असलेल्या 11 खेळांचे स्टार स्पोर्टसवर थेट प्रक्षेपण केले जाईल. ऍथलेटिक्स, कुस्ती, बॉक्सिंग, नेमबाजी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, टेबल टेनिस, टेनिस, कबड्डी, योगासन आणि मलखांब या खेळांचे प्रसारण होणार आहे. दरम्यान या खेळांच्या मशाल, थीम सॉन्ग आणि शुभंकराचे अनावरण नुकतेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते भोपाळ येथील शौर्य स्मारक येथे करण्यात आल आहे.