MP Lok Sabha Election 2024| आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. यातच कॅबिनेट मंत्री प्रल्हाद पटेल यांनी इंदूरमध्ये भाजपच्या जाहीरनाम्यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामांची माहिती दिली. त्यानंतर प्रल्हाद पटेल यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. राहुल गांधींना हिंदी येत नाही, म्हणून भाजपाने निवडणूक जाहीरनामा इंग्रजी भाषेत सुद्धा तयार केला आहे, असा टोला प्रल्हाद पटेल यांनी लगावला आहे.
… तर गेल्या 10 वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर आली असती
पटेल म्हणाले की, “राहुल गांधींच्या आजींनी 50 वर्षांपूर्वी गरिबी हटावचा नारा दिला होता. गरिबी हटवली असती तर गेल्या 10 वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर आली असती. लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागांवर विजयाचा झेंडा फडकवेल. यावेळी छिंदवाड्यातही कमळ फुलणार आणि भाजपचा उमेदवार विजयी होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पटेल यांनी कमलनाथ यांच्यावर देखील निशाणा साधला. “कमलनाथ यांनी घरी हेलिपॅड बनवले आहे. कमलनाथ यांच्या हेलिकॉप्टरची माहिती घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात शेवटच्या दिवसात फक्त पैशासाठी लढाई होत असते. भ्रष्टाचार रोखण्यासाठी भाजप कार्यकर्ते आणि निवडणूक आयोगाला एकत्र काम करावे लागेल. या देशात निवडणूक आयोगापेक्षा कोणीही उच्च नाही. तपासात सर्वांनी सहकार्य करावे,” असेही ते म्हणाले. MP Lok Sabha Election 2024|
राहुल गांधी यांना सल्ला MP Lok Sabha Election 2024|
दरम्यान, रविवारी 14 एप्रिल रोजी दिल्लीतील भाजप केंद्रीय कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यानंतर विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात आली. त्यानंतर कॅबिनेट मंत्री प्रल्हाद पटेल यांनी इंदूरमध्ये जाहीरनाम्यासंदर्भात पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांना भाजपचे संकल्प पत्र नीट वाचण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा: