खेलो इंडियामध्ये मल्लखांबसह पाच स्वदेशी खेळ

युवा गटाच्या स्पर्धांचे हरियाणाला यजमानपद

नवी दिल्ली – खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या वेळापत्रकाला अंतिम स्वरुप लवकरच देण्यात येणार असून यंदा स्पर्धेचे यजमानपद हरियाणाला देण्यात आले आहे. यंदापासून या स्पर्धेत मल्लखांबसह एकूण पाच स्वदेशी खेळांचाही समावेश करण्यात आला आहे.

स्पर्धेच्या यंदाच्या चौथ्या सत्राला 21 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होणार असून 30 नोव्हेंबर रोजी समारोप होईल. स्पर्धेत देशभरातील जवळपास 10 हजारपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होतील. आतापर्यंत युवा स्पर्धेत 17 वर्षांखालील खेळाडू सहभागी होत होते. मात्र, प्रथमच 18 वर्षांखालील खेळाडूदेखील सहभागी होतील.स्पर्धा सुरुवातीला 3 सत्रात आणि दोन वयोगटात खेळवली जाईल. 25 वर्षांखालील गटाची वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात येईल. 18 वर्षांवरील जवळपास खेळाडू खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होतील. या वर्षीपासून खेलो इंडिया युवा स्पर्धेत एका गटात आयोजित करण्यात येणार आहे.

स्वदेशी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी यंदा स्पर्धेत प्रथमच 5 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. युवा स्पर्धेत जवळपास 10 हजार खेळाडू व अधिकारी येणार आहे. यंदाच्या स्पर्धेत ऍथलेटिक्‍स, जलतरण, वेटलिफ्टिंग, तिरंदाजी, ज्युदो, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध, जिम्नॅस्टिक, नेमबाजी, कुस्ती, टेबल – टेनिसे, टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, सायकलिंग, हॅडबॉल अशा एकूण 20 खेळांचा समावेश करण्यात आला असून अन्य पाच स्वदेशी खेळांचाही यंदापासून समावेश करण्यात आला आहे.

स्पर्धेत नव्याने दाखल झालेले क्रीडा प्रकार

थांगता – हा मणिपूरमधील मार्शल आर्टसारखाच क्रीडा प्रकार आहे. ज्यात तलवार, भाला या शस्त्रांचा उपयोग होतो.

गटका – भारतीय मार्शल आर्ट म्हणून ओळखला जात असलेला हा क्रीडा प्रकार शीख समुदायाची पारंपरिक युद्धकला आहे.

कलरिपट्टू – सर्वात पुरातन क्रीडा प्रकार असल्याचे सांगितले जाते. ज्याची सुरुवात केरळमधून झाली.

योगासन – या खेळाला क्रीडा किंवा व्यायाम प्रकार मानले जाते. सरकारने या खेळाच्या स्पर्धेतील समावेशाला मान्यता दिली आहे.

मल्लखांब – हा प्राचीन क्रीडा प्रकार असून लाकडी खांबावर किंवा दोरीवर खेळाडू आपले कसब दाखवतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.