Independence Day 2023 : – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वातंत्र्यदिन सोहळ्याला अनुपस्थित राहिल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला संबोधित केलं. पंतप्रधान म्हणून स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेलं मोदी यांचं हे १०वं संबोधन ठरलं. अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. मात्र मल्लिकार्जुन खर्गे अनुपस्थित राहिल्याने त्यांची खुर्ची रिकामीच राहिली. खर्गे यांच्या अनुपस्थितीवरून आता भाजप नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना, सत्तेविना काँग्रेस पाण्याविना मासा जसा तडफडतो तशी तडफडत असल्याची टीका केली आहे. “देशातील प्रमुख विरोधी पक्षाचा अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेता स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहत नाही, यावरून तुम्ही काँग्रेसचे विचार ओळखू शकता. मासा जसा पाण्याविना तडफडतो तशीच काँग्रेस सत्तेविना तडफडते आहे.” असं अनुराग ठाकूर म्हणाले.
#WATCH | On Congress president-LoP Rajya Sabha Mallikarjun Kharge not attending the #IndependenceDay event at Red Fort, Union Minister Anurag Thakur says, “…If the leader of the main Opposition party and LoP Rajya Sabha doesn’t come, you can imagine the Congress mindset…Today… pic.twitter.com/Fqq7Ki3Nxb
— ANI (@ANI) August 15, 2023
दरम्यान, स्वातंत्र्यदिन सोहळ्याला अनुपस्थित राहिल्याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्टीकरण दिल आहे. “माझ्या डोळ्याला दिसण्यासंबंधित थोडा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला ९.२० वाजता माझ्या घरी आणि नंतर काँग्रेस मुख्यालयावरही तिरंगा ध्वज फडकवायचा होता. लाल किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्था एवढी कडक आहे की, पंतप्रधान गेल्याशिवाय तिथून दुसऱ्या कोणालाही जाऊ दिलं जात नाही. त्यामुळे, कदाचित मी येथे वेळेत पोहोचू शकलो नसतो. म्हणून सुरक्षा यंत्रणेची स्थिती आणि वेळेची कमतरता लक्षात घेऊन मी तिथं न जाण्याचं ठरवलं.” असं खर्गे यांनी सांगितलं आहे.
मोदी जी अगले साल झंडा फहराएँगे अपने घर के ऊपर फहराएँगे – मल्लिकार्जुन खड़गे pic.twitter.com/z7fAt0NoZb
— Sandeep Singh (@ActivistSandeep) August 15, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात विरोधकांवर हल्लाबोल चढवला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पुढील वर्षीही लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करू असं म्हणत आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाचा विश्वास दर्शवला. मोदींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, मल्लिकार्जुन खर्गे यांनी, ‘मोदी पुढील वर्षी तिरंगा फडकावतील, मात्र आपल्या घरावरून लाल किल्ल्यावरून नाही’ असा टोला लगावला.