आजवर ‘माझी’, उद्या नसणार म्हणल्यावर
काय होते प्रेयसीचे लग्न ठरल्यावर?
सागराला भेटण्याची ओढ जाणवते
नेहमी धरणातले पाणी बघितल्यावर
माय आणिक बाप दोघेही घरामध्ये
खूष असते लेकरू रविवार असल्यावर
राहिली नाही भुकेमध्ये मजा आता
नेहमीच्या जेवणाचा प्रश्न सुटल्यावर
यापुढे काहीच बघण्यासारखे नाही
वाटले मजला तिच्या डोळ्यांत फिरल्यावर
– शिवम्