ठोसेघर – जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठाराकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसाने खचल्याने कास पठारावर उमलणारी फुले पाहणे अवघड झाले आहे. गेली अनेक दिवस कास परिसरात संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच साताऱ्याहून कास पठारकडे जाताना पारंबे फाटा, एकीव फाटा तिथून पुढे कास पठारकडे जाताना हेरिटेजवाडी हॉटेलशेजारी आटाळी गावाच्या डाव्या बाजूला संपूर्ण सपाट असणारा रस्ता मध्यातून खचला आहे.
नेहमीप्रमाणे सुरक्षेसाठी असणारे कास कार्यकारी समितीचे कर्मचारी यांच्या निदर्शनास हा रस्ता येताच त्यांनी समिती अध्यक्ष सोमनाथ जाधव यांना या प्रकाराची माहिती दिली. जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्ताच्या दोन्ही बाजूला झाडी टाकून काही काळ कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी देखरेखीखाली ठेवले.
सकाळी कास तलावापर्यंत जाणाऱ्या एसटी बसदेखील अलिकडे थांबवण्यात आल्या. कास कार्यकारी समितीच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. कास मार्गावरील रस्ता खचल्याने वाहतूक व्यवस्था पुर्णपणे ठप्प झाली असुन पारंबे गावाच्या पुढील सर्व गावांचा शहराशी असणारा संपर्क तुटला आहे. सातारा पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन लटकले जरा थांबा.’ असा सबुरीचा सल्ला पवार यांनी दिला. वेतन प्रक्रिया दोन तीन दिवस लांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने सर्वांच्या मुद्रा त्रासिक झाल्या. कारगिल दौऱ्यात अडकलेले मुख्याधिकारी गोरे कधी परतणार, याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहिली जात आहे. आपत्कालीन सेवा सोडून सरकारी अधिकारी दौऱ्यावर कसे जातात, या प्रश्नाचे सध्या कोणाकडे उत्तर नाही.