“दोस्ताना 2’मध्ये कार्तिक-जान्हवीची जोडी

बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर यांच्या आगामी “दोस्ताना 2’मधील जोडीचा सस्पेंस अखेर संपला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांची नावे निश्‍चित मानली जात आहेत. “दोस्ताना 2’मधील आघाडीच्या कलाकारांबाबत काही दिवसांपासून अनेक जणांची नावे चर्चेत आली होती. पण अखेर या सर्व अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे.

जान्हवीने “धडक’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत यशस्वीपणे पर्दापण केले. तर दुसरीकडे कार्तिकनेही आपल्या चित्रपटातून दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तसेच या दोघांसोबत आणखी एक कलाकार काम करणार आहे. यातून ट्राइएंगल रोमांटिक कॉमिडीचे त्रिकूट पूर्ण होणार आहे. या चित्रपटातून करण जोहर दिग्दर्शक कॉलीन डी कुन्हा यांनाही लॉन्च करणार आहे.

करण जोहर म्हणाला, मी “दोस्ताना’ची फ्रंचाइजी कार्तिक आणि जान्हवीसोबत पुढे घेवून जाण्यासाठी खूपच उत्सुक आहे. धर्मा प्रॉडक्‍शनमधील कार्तिकचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. या चित्रपटातून युवा जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे, असे करण याने सांगितले. दरम्यान, “दोस्ताना’मध्ये जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि प्रियांका चोप्रा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील जॉन आणि अभिषेकच्या जोडीला खूपच पसंती मिळाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.