#CWC19 : नाणेफेक जिंकून द.आफ्रिकेचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

चेस्टरलेस्ट्रीट – इंग्लंडचा धुव्वा उडविणाऱ्या श्रीलंकेला स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या लढतीत विजय मिळविणे अनिवार्य आहे. आफ्रिकेने आतापर्यंत या स्पर्धेत सपशेल निराशा केली असून त्यांच्या बाद फेरीच्या आशा यापूर्वीच संपुष्टात आल्या आहेत.

दरम्यान, दक्षिणआफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात रिव्हरसाईड मैदानावर सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाप ड्यु प्लेसिस याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत श्रीलंकेस प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

श्रीलंका – दिमुथ करुणारतने, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, एंजेलो मैथ्यूज, धनंजया डी सिल्वा, जीवन मेन्डिस, थिसारा परेरा, इसुरू उदाना, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा

दक्षिण आफ्रिका – हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, फाफ डू प्लेसी, ऐडेन मारक्रम, रैसी वैन डर डुसेन, जेपी डुमिनी, क्रिस मॉरिस, एन्डिले फेहलुकवेओ, डी.प्रीटोरियस, कगिसो रबाडा, इमरान ताहिर

Leave A Reply

Your email address will not be published.