पुणे – खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष होण्याचा मान कार्तिकी हिवरकर यांना मिळाला आहे. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ४ विरुद्ध ३ मतांनी त्यांनी विजय मिळविला.
उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. खडकी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिग्रेडीयर मनोज कुमार यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.