बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा हॅंडसम हंक म्हणून ओळखला जातो. कार्तिक आपल्या क्युट लूकमुळे तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्यामुळे कार्तिकच्या चित्रपटांची चाहते उत्सुकतेने वाट पाहात असतात.
नुकताच कार्तिक सर्व चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कार्तिक लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. कार्तिकने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ शेयर करत ही माहिती दिली आहे.
सोनू के टिटू की स्वीटी, पती पत्नी और ओ, लव्ह आजकल 2 अशा अनेक चित्रपटांमधून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. फारच कमी वेळेत कार्तिकने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. आणि अगदी कमी वयात बॉलीवूडमध्ये आपलं एक विशेष स्थान निर्माण केले आहे. नुकताच कार्तिक आर्यनने आपल्या इन्स्टाग्रामवर एक छोटासा टीझर शेयर करत आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
तसेच कार्तिकने कॅप्शन देत हा चित्रपट आपल्या मनाच्या खूपचं जवळ असल्याचे म्हटले आहे. “सत्यनारायण की कथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे.”सत्यनारायण की कथा’ हा अभिनेता कार्तिक आर्यन याची मुख्य भूमिका असलेला आणि साजिद नाडियादवाला यांची निर्मिती असलेला चित्रपट आहे.
मात्र खास बाब म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता आपल्या सर्वांचा लाडका दिग्दर्शक समीर विध्वंस हा करणार आहे. त्यामुळे सर्वांनाचं आनंद झाला आहे.