मुंबई – बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा एकापाठोपाठ एक चित्रपटांची घोषणा करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने रोहित धवन दिग्दर्शित “शहजादा’या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हा पासूनच फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. “शहजादा’ चित्रपटात कार्तिक आर्यन सोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलु’ या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन असणार आहे.
‘लुका छुपी’ चित्रपटानंतर कार्तिक आणि क्रिती पुन्हा एकदा सोबत स्क्रीन शेअर करत आहेत. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. दरम्यान, आता कार्तिक आर्यन, क्रिती सेनन स्टारर ‘शहजादा’ या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये कार्तिक दमदार अॅक्शन करताना दिसत आहे. हा चित्रपट रोहित धवनने दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
View this post on Instagram
ट्रेलरमध्ये तुम्हाला अॅक्शन आणि ड्रामा पाहायला मिळेल. या चित्रपटातील कार्तिकच्या पात्राचे नाव ‘बंटू’ असेल. ‘शहजादा’चे दिग्दर्शन डेव्हिड धवनचा मुलगा ‘रोहित धवन’ करत आहे. यापूर्वी रोहितने 2016 मधील ‘ढिशूम’ आणि 2011 मध्ये आलेला ‘देसी बॉईज’ चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘शेहजादा’ चित्रपटाला 23 फेब्रुवारी 2023 ला सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.