पिंपरी – मोशीमधील १९ वर्षीय तरूणी करोना बाधित असल्याचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाला. यामुळे शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या ८५ वर गेली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शनिवारी शहरात दोनजण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर रविवारी सकाळी मोशी येथील १९ वर्षीय तरूणीला करोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.
सध्या ४९ करोना बाधित रूग्ण शहरातील रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर नऊ रूग्णांवर पुण्यात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत चार रूग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी एकजण शहराबाहेरील आहे. आत्तापर्यंत २४ रूग्ण करोना मुक्त झाले आहेत.