बंगळुरू : टिपू सुल्तान हा अत्याचारी होता. त्यांने हिंदूंना गजाआड केले त्यामुळे 18 व्या शतकातील म्हैसुरचा राजा टिपू सुल्तान याचा धडा पाठ्यपुस्तकातून वगळण्यात येईल, असा निर्णय कर्नाटकाकतील भाजपा सरकारने घेतला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
शाळेच्या पाठ्यपुस्तकांत टिपू सुल्तानचा धडा असायलाच नको होता. आम्ही तो यापुढे सुरू ठेवू शकत नाही, असे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी पत्रकारांना सांगितले.
टिपू (1750 -1799) हा दक्षिण भारतातील म्हैसुर प्रांताचा राजा होता. म्हैसुरजवळील श्रीरंगपटण येथे झालेल्या ब्रिटीशांबरोबरच्या युध्दात ते मारले गेले. त्यापुर्वी त्यांनी ब्रिटीशांविरूध्द अनेक युध्द जिंकली होती.
जबरदस्तीने धर्मांतर, देवालये जमीनदोस्त करणे आणि हिंदूंचा छळ करण्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. त्यामुळे त्यांची जयंती 10 नोव्हेंबरला शासकीय उत्सव म्हणून साजरी न करण्याचा निर्णय आम्ही यापुर्वीच घेतला आहे, असे येडीयुरप्पा म्हणाले. ते मिट द प्रेस या कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान, टिपू यांची जयंती राज्यात साजरी करण्यावर बंदी घालण्याच्या आणि त्यांच्या जीवनावरील धडा वगळण्याच्या निर्णयाला कॉंग्रेसने विरोध केला आहे. टिपू यांचा धडा वगळण्याचा आणि जयंतीवरील बंदीचा निर्णय दुर्देवी आहे. ब्रिटिशांशी लढत देश स्वतंत्र ठेवण्यासाठी झुंजणारे ते पहिले स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनो गठ्ठामतदानासाठी वैचारीक विरोध करणे चुकीचे आहे, असे सिध्दरामय्या म्हणाले.
दरम्यान, कन्नड आणि इंग्लिश माध्यामांच्या धड्यात टिपूचे वर्णन देशभक्त म्हणून केले आहे. मात्र तो अत्याचारी होता आणि त्याने जबरदस्तीने हिंदुंचे धर्नांतर घडवले याचा उल्लेख नाही, असे पत्र भाजपाचे माडिकेरीचे आमदार अप्पाचू राजन यांनी लिहले होते. त्यावर अभ्यास करण्याचे आदेश राज्याचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी पाठ्यपुस्तक मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले होते.