USA vs Bangladesh, 1st T20i Highlights : अमेरिकेच्या क्रिकेट (USA) संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात बांगलादेशचा आश्चर्यकारकपणे पराभव केला आहे. अमेरिकेने हा सामना तीन चेंडू आणि 5 विकेट राखून जिंकला. अमेरिकेच्या या विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका भारतीय वंशाच्या हरमीत सिंगची होती. हरमीतने या सामन्यात अवघ्या 13 चेंडूत 33 धावा करत बांगलादेशला थक्क केले. हरमीत सिंग ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. यासह अमेरिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (23 मे) ह्युस्टनमध्ये खेळवला जाणार आहे.
बांगलादेशचा पराभव करून अमेरिकेने टी-20 विश्वचषकाच्या तयारीला चांगली सुरुवात केली आहे. यावेळी अमेरिकेने वेस्ट इंडिजच्या सहकार्याने टी-20 विश्वचषक आयोजित केला आहे. या स्पर्धेत ग्रुप स्टेजचे सामने फक्त अमेरिकेत खेळवले जातील. बांगलादेशसोबतची ही तीन सामन्यांची मालिका अमेरिकेसाठी मुख्य सराव आहे, जेणेकरून ते विश्वचषकासाठी चांगली तयारी करू शकतील. अमेरिका क्रमवारीत 19 व्या क्रमांकावर असली तरी क्रमवारीत 9व्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशचा पराभव त्यांनी एक मोठा उलटफेर केला आहे.
प्रेरी व्ह्यूमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने प्रथम खेळताना 6 बाद 153 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून तौहीद हार्डॉयने 47 चेंडूत 58 धावांची शानदार खेळी केली. अखेरीस महमुदुल्लाहने 31 धावांची खेळी खेळली. अमेरिकन संघाकडून स्टीव्हन टेलरने 2 बळी घेतले. तर सौरभ नेत्रावलकर, अली खान, जसदीप सिंग यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
What a win! USA win the first T20i by 5 wickets! 🤩
Stay tuned for the next match on May 23rd! 🏏#USAvBAN #WeAreUSACricket 🇺🇸 pic.twitter.com/qNXcOhjo6u
— USA Cricket (@usacricket) May 21, 2024
प्रत्युत्तरात पाठलाग करताना अमेरिकेच्या संघाकडून स्टीव्हन टेलर (28) आणि मोनांक पटेल (12) यांनी पहिल्या विकेटसाठी 27 धावा जोडल्या. यानंतर अँड्रियास गॉस खेळायला आला. पण संघांची धावसंख्या 65 असताना गाॅस 23 धावांवर बाद झाला. हा अमेरिकेसाठी दुसरा धक्का होता. यानंतर अमेरिकेला सलग धक्के बसले, एकेवेळ अमेरिकेची धावसंख्या 5 बाद 94 अशी होती. यानंतर, न्यूझीलंडचा माजी खेळाडू कोरी अँडरसन (25 चेंडूत 34 धावा) आणि भारतीय वंशाचा हरमीत सिंग (13 चेंडूत 33 धावा) अमेरिकेसाठी संकटमोचक ठरले . दोन्ही फलंदाजांनी तुफानी फलंदाजी करत 19.3 षटकांत 156 धावा केल्या आणि आपल्या संघाला पाच विकेट्स राखून ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
Bangladesh 🆚 USA | 1st T20i
USA won by 5 wickets#BCB #Cricket #BANvUSA #BDCricket #Bangladesh pic.twitter.com/wZWqJCk0kN— Bangladesh Cricket (@BCBtigers) May 21, 2024
कोण आहे हरमीत सिंग?
मुंबईत 7 सप्टेंबर 1992 रोजी जन्मलेला हरमीत सिंग हा डावखुरा फिरकी अष्टपैलू खेळाडू आहे. माजी भारतीय फलंदाज दिलीप सरदेसाई यांनी जेव्हा पहिल्यांदा त्याची कृती पाहिली तेव्हा त्यांनी हरमीतची तुलना त्याच्या समकालीन फिरकीपटू बिशन बेदीशी केली. वयाच्या 19 व्या वर्षी हरमीतने दोन अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला होता.
2010 मध्ये तो खूप महागडा ठरला, दोन वर्षांनंतर त्याने 3.02 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली. महत्त्वाची बाब म्हणजे 2012 मध्ये उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला होता, त्या काळात संपूर्ण विश्वचषकात त्याने अतिशय प्रभावी गोलंदाजी केली होती. त्याने सर्वात कमी धावा दिल्या होत्या.
आयपीएलमध्येही सहभाग….
हरमीत मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला. त्याने 2009 मध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2009 मध्ये तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता. त्याने आयपीएलच्या एकूण 27 सामन्यात 25 विकेट घेतल्या.