नवी दिल्ली : जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी कारगील युध्दात सहभागी झालेल्या सुरक्षा सैनिकांनाही मारहाण केल्याचे समोर येत आहे. जाममियामध्ये 19 वर्षापासून कार्यरत असणारे नझीर खान हे जम्मूमध्ये तोफदळात कार्यरत होते. त्यांना दिल्ली पोलिसांच्या अरेरावीचा अनुभव आला.
सुमारे 50 ते 60 पोलिसांनी विद्यापीठाची दारे तातडीने उघडण्यास सांगितले. त्याला खान यांनी नकार दिला. त्यावेळी खान यांना मारहाण करून कुलूप उघडायला लावून पोलिस विद्यापीठात घुसले. त्यानंतर ते ग्रंथालयात जाऊन अश्रुधुराच्या नळकांडी फोडली.
त्यांनी जबरदस्तीने मला कुलूप उघडायला लावले. ज्यावेळी मी नकार दिला त्यावेळी काठीने आणि बंदूकीच्या दस्त्याने मला बेदम मारहाण केली, असे त्यांनी सांगितले. 1999च्या कारगिल युध्दात भाग घेतलेल्या नझीर खान यांना पोलिस असे का वागू शकतात, हा प्रश्न सतावत आहे.