बॉलीवूडमधील बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर ही सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडिओज् चाहत्यांशी शेअर करत असते. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओत करिना कपूर ही आपल्या बेबी बंपसह डान्स करताना दिसत आहे. यात करीना कपूर ही फारच सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ तिच्या हेअर स्टाइलिस्टने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओत तिने नारंगी रंगाचा फुल स्लीव टॉप आणि लाइट नारंगी रंगाचा स्कर्ट घातला आहे. स्कर्ट हातात पकडून ती डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओत करिनाने पोनी बांधली आहे. प्रेग्नेंट असूनही करिना खूप सुंदरतेने शूट करत आहे. खरेतर हा व्हिडिओ कोणते तरी प्रमोशन शूट आहे. करीना कपूर-खान दुसरी प्रेग्नेंसी खूप एन्जॉय करत आहे.
View this post on Instagram
तिचा नवरा आणि अभिनेता सैफ अली खानचे म्हणणे आहे की ती फेब्रुवारीच्या सुरुवातीला दुसऱ्या बाळाला जन्म देऊ शकते. नवीन बाळाच्या जन्माआधी सैफ अली खान आणि करिना कपूर मुलगा तैमूरसोबत नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास करीना कपूरने प्रेग्नेंसीदरम्यान आमिर खानसोबत “लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाचे नुकतेच शूटिंग पूर्ण केले आहे.