मुंबई – बॉलिवूडची सर्वात ग्लॅमर्स अभिनेत्री करीना कपूर नेहमीच तिच्या ग्लॅमर्स लुकसाठी चर्चेत असते. “चमेली’, “अशोका’ आणि “जब वुई मेट’ सारख्या रोलमुळे तिला नायिकांमधील लुक आणि हटके अंदाजामुळे ती ओळखली जाते. तसेच नेहमीच सोशल माध्यमामध्ये ग्लॅमर्स लुक आणि अभिनयला युजर्स दाद देत असतात. यातच अभिनेत्री करीना कपूर खान कुटुंबियांना वेळ देण्यासोबतच तिच्या त्वचेचीदेखील काळजी घेत आहे. नुकतंच तिने तिच्या सौंदर्याचं गुपित सांगितलं आहे.
उत्तम फॅशनसेन्ससाठी करीनाची कायमच चर्चा होत असते. त्यामुळे अनेक तरुणी तिची स्टाइल फॉलो करण्याचा प्रयत्न करतात.यातच तिने तिच्या सौंदर्याचं गुपित उघड केलं आहे. लॉकडाउनमुळे सारं काही बंद असल्यामुळे ब्युटीपार्लर, ब्युटी सॅलॉन सारं काही बंद आहे, त्यामुळे या काळात करीनाने त्वचेची काळजी घेण्यासाठी घरात सहज उपलब्ध होतील अशा पदार्थांपासून फेसपॅक वापरण्यास सुरुवात केली आहे. तिने इन्स्टग्रामवर एक पोस्ट शेअर करुन ती घरगुती फेसपॅक वापर असल्याचं सांगितलं आहे.
करीनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने चेहऱ्यावर फेसपॅक लावला असून, ‘उन्हाळ्यात आवश्यक असणाऱ्या गोष्टी मेस्सी बन, कफ्तान आणि होममेड मास्क’, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. सध्या करीनाची ही पोस्ट चाहत्यांना आवडत असून १६ लाखांपेक्षा अधिक जणांनी ही पोस्ट पाहिली आहे. तर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.