करीना कपूरचा असा इगो काय कामाचा? मराठी दिग्दर्शकाने केलेली बॉलिवूड अभिनेत्रींची सतत्या सांगणारी पोस्ट चर्चेत
मुंबई – करीना कपूर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत. करीना ही बॉलिवूडमधील टॉप आणि महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र, ती अनेकदा वाईट वागणुकीमुळे चर्चेत आली आहे. मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी करीना कपूर तिच्या चाहत्यांकडे आणि सहकाऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हंटले आहे.
टिळेकर यांची पोस्ट जशीच्या तशी
कुठं मूर्ती आणि कुठे करीना?
नुकताच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडिओ पाहिला ज्यात ते सांगत होते की लंडनहून ते भारतात येत असताना फ्लाईटमध्ये त्यांच्या पुढच्या सीटवर करीना कपूर बसली होती. फ्लाईट मधील काही लोक नारायण मूर्ती यांच्याजवळ येऊन त्यांना अभिवादन करत होते ,दोन शब्द बोलत होते आणि लोक आपल्याला रिस्पेक्ट देतायेत म्हणून मूर्ती उभे राहून त्यांच्याशी संवाद साधत होते, पण काही चाहते करीना कपूर जवळ जाऊन तिला हॅलो म्हणत होते तर ही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती आणि ही गोष्ट नारायण मूर्ती यांना खूप खटकल्याचे त्यांनी सांगितले आणि करिनाचा असा इगो काय कामाचा? असा प्रश्नही त्यांनी केला”.
टिळेकर पुढे म्हणतात,”8 वर्षांपूर्वी आमचा मराठी तारका कार्यक्रमाचा परदेशातून शो करून एअरपोर्ट वर आल्यावर पुन्हा तिथे चेकिंग साठी असणाऱ्या रांगेत मी उभा होतो,तर आमच्या कार्यक्रमातील एका मराठी अभिनेत्रीच्या पुढे करीना कपूर उभी होती,तिचा पासपोर्ट दाखवून ती पुढे वळताना तिचा चेहरा दिसला तसा आपली मराठी अभिनेत्री तिच्याशी बोलायला म्हणून लाळ घोटेपणा करत तिच्या मागे धावत गेली पण करीना तिला फाट्यावर मारत झपाझप पावले टाकत पुढे निघून गेली. बरं याच मराठी अभिनेत्रीने करीना कपूर च्या एका लोकप्रिय सिनेमात एका सिन साठी नगण्य भूमिका केली होती तरी देखील करीनाने तिच्याकडे मान वळवून ही पाहिलं नाही, फोटो काढणं तर दूरच.”
“पण हेच स्वतःच्या प्रेमात असणारे काही सेलिब्रिटी यांचा एखादा सिनेमा रिलीज व्हायचा असेल तेंव्हा जनमानसात मिसळून, चाहत्यांबद्दल प्रेम असल्याचा जो अभिनय करतात त्याला खरच तोड नाही.मागे एका इंटरव्ह्यू मध्ये हिंदीत काम करणारी मराठी अभिनेत्री राधिका आपटे हिने तिला लोकांना फोटो,सेल्फी द्यायला आवडत नाही, ती सही पण देत नाही चाहत्यांना असं सांगत होती. पण काहीच दिवसांपूर्वी OTT वर रिलीज झालेल्या तिच्या एका हिंदी सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने मात्र सोशल मीडियावर पॉप्युलर असणाऱ्या काही इन्फ्लुंसर बरोबर सेल्फी देऊन स्वतः ची प्रसिध्दी करून घेत होती. बरं या बयेला ती कुठं राहते तो पत्ता पण लोकांना, तिच्या चाहत्यांना कळू नये असं वाटतं.जर समजलं लोकांना ही कुठं राहते मुंबईत तर काय फरक पडणार आहे? अमिताभ बच्चन,सलमान,शाहरुख यांना पहायला जशी गर्दी जमते तसा जनसमुदाय हीची एक झलक दिसावी म्हणून हिच्या बिल्डिंग बाहेर जमा होणार आहे का? जेंव्हा कामे मिळणं बंद होतं, प्रसिद्धीचा काळ संपतो तेंव्हा कुणीतरी आपली दखल घ्यावी म्हणून बेचैन होणारे अनेक नट नट्या मी जवळून पाहिले आहे.”
View this post on Instagram
महेश टिळेकर हे मराठीतील हे मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि शो निर्माते आहेत. वन रूम किचन,गाव तस चांगलं यासोबतच मराठी तारका नावाचा भव्य दिव्य शो देखील टिळेकर यांनी केलेला आहे. ज्यामध्ये हिंदीतील बड्या बड्या नायिका एकाच मंचावर एकत्र आल्या होत्या.