करीना कपूर लवकरच सुरू करणार “अंग्रेजी मीडियम’चे शूटिंग

बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता दिनेश विजान यांच्या आगामी “अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचे शूटिंग गतमहिन्यात राजस्थानमधील उदयपुर येथे सुरू करण्यात आले आहे. या चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण करून टीम मुंबईत शूटिंग करणार आहे. या शूटिंगसाठी करीना कपूर 15 मेपासून टीममध्ये सहभागी होणार आहे.

या चित्रपटाच्या शूटिंगची करिनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. “अंग्रेजी मीडियम’मध्ये ती पहिल्यांदाच कॉपचा रोल साकारत आहे. ही भूमिका साकारण्यासाठी करीना कपूर दिग्दर्शक होमी अदजानिया यांचे मार्गदर्शन घेत आहे. करीना कपूर जूनमध्ये लंडनला जाणार आहे. त्यापूर्वी एक आठवडा ती मुंबईत शूटिंग करणार आहे.

या चित्रपटात इरफान खानसोबत तिची रोमांटिक भूमिका नाही. मात्र, ती चित्रपटात निर्णायक भूमिका साकारणार आहे. यात राधिका मदन ही इरफान खानच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.

दरम्यान, अभिनेता इरफान खान हा कॅसरवर उपचार केल्यानंतर भारतात परतला आहे. त्यानंतर “अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा पहिला चित्रपट आहे. तर करीना कपूरही अक्षय कुमारसोबतच्य “गुड न्यूज’मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट 27 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.