पशुधनाच्या नोंदीसाठी 15 मे पासून संगणकीय प्रणाली अनिवार्य- जिल्हाधिकारी

 चारा छावण्यांमधील पशुधनाच्या रोजच्या आहारात केली वाढ

नगर: जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांमधील पशुधनाची दैनंदिन उपस्थिती नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करणे तसेच पशुधनाच्या दैनंदिन आहारामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. यासंर्भात महसूल विभागाने 4 मे रोजी शासन निर्णय जारी केल्याचे ते म्हणाले.

याशिवाय, चारा छावण्यांमधील पशुधनाची नोंदणी करून पशुधनाच्या संख्येची दैनंदिन नोंद ठेवण्यासाठी ऍन्ड्राईड मोबाईल (लरीशव चेलळश्रश वर आधारित प्रणालीचा चेलळश्रश वापर चारा छावण्यांना अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर प्रणालीचा वापर करण्यासंदर्भातील कार्यपध्दती व अंमलबजावणीबाबतच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. प्रणालीचे प्रशिक्षण, चारा छावणीतील पशुधनाची नोंदणी व पशुधनाची दैनंदिन नोंद घेण्यास सुरूवात करणे अशी संपूर्ण कार्यवाही 15 मे पर्यंत पूर्ण करून त्यानंतर या प्रणालीचा वापर बंधनकारक असणार आहे.

जिल्ह्यातील पशुधनासाठी आवश्‍यक असणारा चारा व पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी जनावरांच्या छावण्या उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रति पशुधन अनुदानाचे दर सुधारित करण्यात आले आहेत. व दुसरी चारा छावणी उघडण्यास मान्यता देण्यबाबत सुधारित निकष निश्‍चित करण्यात आले आहेत. चारा छावणी चालकांना प्रति पशुधनाच्या आधारे अनुदान देय असल्याने चारा छावण्यांमधील पशुधनाची दैनंदिन नोंद ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. अशी नोंद ठेवण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानावर आधारित संगणकीय प्रणालीचा वापर अनिवार्य असून चाऱ्याच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. पशुधन संख्येची दैनंदिन नोंद ठेवण्यासाठी शौर्य टेक्‍नोसॉफ्ट प्रा.लि. या संस्थेने तयार केलेली प्रणाली (उरीींश्रश उरा चिरपरसशाशपीं डूीींशा) विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या व नव्याने सुरू होणाऱ्या सर्व चारा छावण्यांमध्ये बंधनकारक आहे.


गायी, म्हशींच्या कानास बसविणार बारकोड टॅग

चारा छावणी चालकांनी त्यांच्या छावणीमध्ये दाखल झालेल्या पशुधनांच्या कानामध्ये बारकोड असलेले टॅग लावून घ्यावेत. यासाठी होणारा खर्च छावणी चालकांनी स्वतः करावा.अशा स्वरूपाचे बार कोड असलेले टॅग खुल्या बाजारात उपलब्ध होतील. जिल्हाधिकारी हे शौर्य टेक्‍नोसॉफ्ट प्रा.लि या संस्थेशी संपर्क साधून बार कोड टॅगवरील नंबर दुबार वापरला जाणार नाही अशा पध्दतीने टॅगवरील क्रमांक निश्‍चित करतील. त्याचप्रमाणे प्रत्येक चारा छावणी चालकांनी त्यांच्याकडे अतिरिक्त टॅग देखील उपलब्ध ठेवावेत व नव्याने दाखल होणाऱ्या पशुधनांची नोंदणी करून त्यांच्या कानामध्ये बार कोडेड टॅग लावूनच प्रवेश देण्यात येणार आहे. बार कोडेड टॅग पशुधनांच्या कानामध्ये लावण्याची कार्यवाही पशुधन अधिकारी किंवा त्या विभागाचे प्रशिक्षित कर्मचारी यांचेमार्फत करण्यात येणार आहे. छावणीतील पशुधनाची दैनंदिन संख्या मोजण्यासाठी मोबाईलवरील अप्लीकेशनचा वापर करून प्रत्येक पशुधनाच्या कानातील टॅगवरील बारकोड दिवसातून एकदा स्कॅन करावा लागणार आहे.


रोगप्रतिकारक शक्‍ती वाढण्यासाठी योग्य आहार

दुष्काळी परिस्थिती विचारात घेता दैनंदिन पोषण व्यवस्थित होवून चारा छावण्यांमध्ये दाखल होणाऱ्या पशुधनांची रोग प्रतिकारक शक्ती आणि उत्पादन क्षमता कायम राहण्याकरिता त्यांना योग्य आहार देणे गरजेचे असल्याने छावणीत दाखल झालेल्या मोठ्या व लहान पशुधनास प्रतिदिन दयावयाच्या चाऱ्याचे प्रमाण निश्‍चित करण्यात आले आहे. मोठे जनावरास प्रतिदिन 90 व लहान जनावर प्रतिदिन 45 रुपये वाढ करण्यात आलेली आहे.


जनावरांना आले अच्छे दिन

मोठ्या जनावरांसाठी असणारे चाऱ्याचे (हिरवा चारा, उसाचे वाडे, ऊस) पूर्वीचे प्रमाण 15 किलो ग्रॅम होते, ते आता 18 किलो ग्रॉम करण्यात आले असून लहान जनावरांसाठी हे प्रमाण 7.5 किलो. ग्रॅम वरुन 9 किलो ग्रॉम करण्यात आले असल्याने जनावरांना ही अच्छे दिन आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.