डॉ. आंबेडकर हॉकी स्पर्धेत 18 संघांचा सहभाग

पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत पुणे शहरातील 18 संघ सहभागी होत असून ही स्पर्धा आजपासून (6 मे) मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरू नगर-पिंपरी येथील मैदानावर सुरू होत आहे. हॉकी महाराष्ट्र यांच्या मान्यतेखाली होणारी ही स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्‌, सोशल अँड कल्चरल ऍकॅडमी यांनी आयोजित केली आहे.

ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना 12 मे पासून होणार आहे. स्पर्धेच्या विजेत्यांना करंडक आणि रोख पारितोषिके मिळणार आहे. तसेच स्पर्धेतील उपविजेत्या संघाला आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला करंडक आणि रोख पारितोषिक मिळणार आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी सहा सामने होणार आहेत. स्पर्धेतील सामने पुढीलप्रमाणे – विक्रम पिल्ले ऍकॅडमी ब विरुद्ध सुपर इलेव्हन- सकाळी 10, राजा बांगला विरुद्ध किड्‌स इलेव्हन- सकाळी 11, इनकम टॅक्‍स्‌ विरुद्ध हॉकी लव्हर्स- दुपारी 12, प्रियदशर्नी एससी विरुद्ध फ्रेन्डस्‌ युनियन- दुपारी 1, ग्रीन मेडोज्‌ विरुद्ध हॉकी युनायटेड- दुपारी 3, पीसीएमसी विरुद्ध पुणे सिटी लाईन बॉईज- दुपारी 4.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.