निघोज – वर्ल्ड कुंफू मार्शल आर्ट ऑफ इंडिया प्रोफेशनल तायक्वांदो कराटे क्लब निघोज या क्लासच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या अहमदनगर जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवून सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
17 वर्षे वयोगट 35 वजन गट मधे राजनंदिणी राजेंद्र गायखे 17 वर्ष वयोगट 72 वजन गट ओम अविनाश कारकुड 19 वर्ष वयोगट 55 वजन गट आदिती अविनाश कारकुड यांना सुवर्णपदक मिळाले असून 17 वर्षे वयोगट 47 वजन गट परवेज सुलतान तांबोळी हा रौप्य पदक मानकरी ठरला आहे. हे विद्यार्थी मुलिका देवी विद्यालय व ज्युनियर कॉलेज निघोज या शाळेमध्ये शिकत आहेत व या विद्यार्थ्यांची विभागाला निवड झालेली आहे.
तसेच शिरूर तालुक्यामध्ये शिक्रापूर येथे शिक्षक भवन येथे झालेल्या महाराष्ट्र शासनातर्फे तायक्वांदो स्कूल गेम तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये वेदिका तनपुरे 14 वर्ष वयोगट 54 वजन गट ब्राँझ पदकाची मानकरी ठरली आहे. तनपुरे ही विद्यार्थीनी शिरुर येथील पोदार इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे. या सर्व विजेत्यांना प्रशिक्षक ओमकार रणसिंग तसेच क्लासचे संस्थापक विक्रांत रणसिंग यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
यावेळी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सत्यम कवाद याचा तसेच या विजेत्या विद्यार्थ्यांंचा पारनेर तालुका पत्रकार संघ,निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, आपला गणपती समाजसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद, पारनेर तालुका पत्रकार संघाचे निघोज शहराध्यक्ष योगेश खाडे, आपला गणपती समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवि रणसिंग, ज्येष्ठ मार्गदर्शक भास्करराव सोनवणे, प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब लंके, शितल निघोजकर ,तांबोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी विकर्ण निघोजकर, सुफियान तांबोळी, तन्मय बेलोटे, काव्या कवाद, मैथिली गायकवाड, रोहन गवळी , त्रिषा लंके, हर्ष निकाळजे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार रणसिंग, विक्रांत रणसिंग यांनी केले शेवटी आपला गणपती समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवि रणसिंग यांनी आभार मानले.