एक काळ असा होता की एकता कपूर आणि करण जोहर यांच्या लग्नाची खूपच चर्चा होत होती. दरम्यान, या दोघांनीही ते बेस्ट फ्रेंडस् असल्याचे सांगितले. आता एकता कपूरच्या वाढदिवशी (7 जून) करण जोहरने एक सुंदर असा संदेश पोस्ट करत तिला खास “बर्थ डे विश’ केले आहे.
एकता कपूर आणि करण जोहर यांच्यात अनेक साम्य आहेत. आपण मोजायला बसल्यास आश्चर्यचकित व्हाल. या दोघांनाही “क’ अक्षर आवडते. तसेच सरोगसीतून एकल पालक बनण्यापासून अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कॉमन आहेत. एकताच्या वाढदिवशी करण जोहरने एक संदेश पोस्ट केला आहे. त्यासोबतच एक आवडता फोटो देखील आहे.
त्याने लिहिले की, हा माझा आवडता फोटो आहे! आय लव यू एकतु!!! तू माझ्यासाठी खूप खास आहेस आणि मला तू नेहमीच आधार दिला आहेस. आपले डिनर्स आणि आपल्या गोष्टी हा सर्वच मला खूप प्रिय आहेत. आपले एक कार्मिक कॉस्मिक कनेक्शन आहे आणि मला माहीत आहे की तू नेहमीच माझ्याबरोबर असशील… शोभा आंटी आणि तुझ्याबरोबर डिनर करण्यासाठी खूप उत्सुक आहे!!! रुही यश मॉम आणि माझ्याकडून हग्ज आणि किस. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास एकता कपूर आपल्या सीरियल्स आणि वेब सीरीजमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे करण जोहर त्याच्या आगामी “तख्त’ चित्रपटाची तयारी करीत आहे. “तख्त’मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, करीना कपूर, जान्हवी कपूर, विकी कौशलसह अनेक स्टारकास्ट आहेत.