कराड -येथील प्रीतीसंगमवर पोहायला गेलेल्या कैलास तुकाराम प्रजापती (वय 17, रा. सोमवार पेठ, कराड) याचा बुधवारी सकाळी 7.30 च्या सुमारास नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवार पेठेतील कैलास प्रजापती हा बुधवारी सकाळी साडेसात वाजता पोहायला प्रीतिसंगमावर गेला होता.
पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडू लागला. हे लक्षात येताच सकाळी नदीत पोहायला आलेल्या नागरिकांनी त्याला त्वरीत बाहेर काढले आणि उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.