कराड | मलकापूर येथील अपघातात 18 जण जखमी

कराड (प्रतिनिधी) – ऊसतोडणी मजुरांना घेऊन बीड जिल्ह्यात निघालेल्या ट्रक्‍टर-ट्रॉलीला पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून मलकापूर येथे हॉटेल गंधर्वजवळ मिनी बसने शुक्रवारी सकाळी पावणेसात वाजता पाठीमागून धडक दिली. या अपघातात आठ मजूर व मिनी बसमधील दहा प्रवासी जखमी झाले आहेत. एक मजूर व बसमधील दोघे गंभीर जखमी आहेत.

याबाबत माहिती अशी, ट्रॅक्‍टर (एमएच-23-एएस-1636) व त्याला जोडलेल्या ट्रॉलीमधून साहित्यासह आठ ऊसतोड मजूर अथणी येथून आहेरवडगावा (जि. बीड) येथे निघाले होते. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर येथे हॉटेल गंधर्वजवळ मिनी बसने (केए-18-सी-4159) ट्रॅक्‍टर-ट्रॉलीला पाटीमागून धडक दिली. 

या अपघातत आठ ऊसतोड मजूर व बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस चिकमंगळूरहून पुण्याकडे निघाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.