नगर – करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत. करोना लस आता ठराविक वयोगटातील व्यक्तींना शासकीय रुग्णालयांमध्ये सोमवारपासून मोफत मिळणार आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडे कोविड लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. लसीकरण मोहीम व्यापक करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नियोजन केले आहे.
जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून, दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत आहे. जिल्ह्यात सरासरी दररोज दोनशे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका हद्दीत कोविड लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर, जिल्ह्यात 31 खासगी रुग्णालयात लस उपलब्ध झाली असून तिथे नागरिक लस घेऊ शकतात.
जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात तत्काळ लस उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने तातडीची पाऊले उचली आहेत. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध होणार आहे.
साठ वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तीने लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जावे आणि जातना आधारकार्ड बरोबर ठेवणे आवश्यक आहे. लस घेणारी व्यक्ती कोविंन अॅपवर नोंदणी करू शकते किंवा लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर तिथेही नोंदणी करता येईल. त्यासाठी मोबाईल (ओटीपीसाठी) आवश्यक आहे. एका मोबाईलवरून चार व्यक्ती नोंदणी करू शकतात.
45 ते 59 वय असणार्यांना व्यक्तींनाही लस दिली जाणार आहे. उच्च रक्तदाब, किडनी विकार, मधुमेह असा आजार असल्यास संबंधित व्यक्तीने वैद्यकीय अधिकार्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीने ते प्रमाणपत्र उपलब्ध करणे गरजेचे आहे. लसीकरण मोहीम व्यापक करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकार्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजली.
आरोग्य विभागाकडे पुरेशाप्रमाणात कोविड डोस उपलब्ध असून, नागरिकांनी अॅपवर तत्काळ नोंदणी करून लस घ्यावी. नोंदणी नसल्यास लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करावी.
-डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.