मुंबई – प्रसिद्ध कॉमेडियन, अभिनेता कपिल शर्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. कपिल शर्माने अब्बास-मस्तान दिग्दर्शित ‘किस किसको प्यार करूं’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आहे. त्यानंतर त्याने ‘फिरंगी’, ‘ज्विगातो’ या चित्रपटांमध्ये देखील काम केले. अशातच कपिलला पुन्हा एकदा चित्रपटात काम करण्याची संधी आली आहे.
एकता कपूर आणि रिया कपूर दिग्दर्शित ‘द क्रू’ या आगामी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्याची ऑफर कपिलला देण्यात आली आहे. मात्र यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनन, तब्बू, करीना या बड्या अभिनेत्रीही दिसणार आहेत. काही दिवसांपुर्वीच करीना आणि क्रितीने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
तर तब्बूने या आठवड्यात शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटात कपिल बरोबरच पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचे ही नाव समोर येत आहे. या चित्रपटाचे शूटिंग भारतातील विविध भागात होणार असून त्यातले बऱ्यापैकी शूटिंग हे मुंबईत होणार आहे. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली नसून, प्रेक्षक देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.